मांजराला निष्ठूरपणे मारणाऱ्याला अटक

  Santacruz
  मांजराला निष्ठूरपणे मारणाऱ्याला अटक
  मुंबई  -  

  पूर्वी चुकून एखादी मांजर आपल्या हातून मारली गेल्यास, पापातून मुक्तीसाठी काशीला जाऊन सोन्याची मांजर वाहिली जायची किंवा गंगेच्या पाण्यात स्नान करून पापमुक्तीसाठी प्रार्थना करायची, असा समज होता. पण आजच्या निर्दयी जमान्यात काही विक्रृत मनोवृत्तीचे लोक प्राण्यांची निष्ठूरपणे हत्या करतात. याचाच प्रत्यय सांताक्रूझमध्ये आला आहे.

  एका दीड महिन्यांच्या चिमुकल्या मांजरीच्या पिलाला मारल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी मनोज आंगणे (30) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. विशेष म्हणजे पिलाला मारल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रिटेल कन्सल्टंट असलेल्या युवराज भावसार यांचे सांताक्रूझ पश्चिम येथे कार्यालय आहे. मांजरीची आवड असल्याने ते नेहमीच मांजरीना खायला घालतात.

  काही दिवसंपूर्वी आपण दुपारी बाहेर जेवायल गेलो होतो, तेव्हा मांजर आणि तिची तिन्ही पिल्ले कार्यालयाबाहेर खेळत होती. पण तासाभराने जेव्हा आपण परतालो तेव्हा एक पिल्लू मेलेले आढळले. त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याने त्याची कुणीतरी हत्या केल्याचा संशय आला. त्यामुळे आपण शेजारच्या कार्यालयामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ते बघून मला धक्काच बसला. त्यात शेजारच्या कार्यालयातील शिपाई मनोज आंगणे (30) याने त्या मांजरीला बांबूने मारले, अशी माहिती भावसार यांनी दिली. 

  यामुळे ज्या कंपनीत मनोज काम करत होता, त्यांनी त्याला काढून टाकावे अशी इच्छा युवराज यांनी व्यक्त केली. पण त्यांनी तसे न केल्याने शेवटी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात मनोज आंगणे विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे युवराज भावसार पुढे म्हणाले. या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली असल्याची माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांतनू पवार यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.