COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

मैत्री तोडल्याने तरुणीवर प्राणघातक हल्ला

तरुणाने तरूणीच्या आईवरही हल्ला केला. यामध्ये तरुणी आणि तिची आई जखमी झाली आहे. तर हल्ल्यानंतर तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मैत्री तोडल्याने तरुणीवर प्राणघातक हल्ला
SHARES

 मैत्री तोडल्यामुळे तरुणाने एका तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे. या तरुणाने तरूणीच्या आईवरही हल्ला केला. यामध्ये तरुणी आणि तिची आई जखमी झाली आहे. तर हल्ल्यानंतर तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वालीव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई एव्हरशाईन येथे २९ वर्षीय पिडीत तरुणी राहते. सोमवारी सकाळी ती तिच्या आईसोबत घरात असताना तिच्या मित्राने घरात प्रवेश करून अचानक हल्ला केला. त्याने धारदार चाकूने  तरुणीवर आणि तिच्या आईवर अनेक वार केले आहे. या घटनेनंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी युवतीला व तिच्या आईला रुग्णालयात दाखल केलं आहे.  तर तरुणावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी तरुणाची प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हल्लेखोर तरुण हा या तरुणीचा मित्र आहे.  गेल्या काही काळापासून त्या दोघांचे मैत्रीचे संबंध होते. तिने त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध तोडले होते.याच रागातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा