'कुलभूषण यांच्या कुटुंबीयांची भेट हा ड्रामा'

सोमवारी सकाळी कुलभूषण जाधव यांना त्यांची आई आणि पत्नी तब्बल दीड वर्षानंतर भेटली. यावेळी कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई आणि पत्नीमध्ये काचेची भिंत होती. अर्धा तास ते ४० मिनिटे जो काही संवाद झाला, तो संपूर्ण संवाद हा इंटरकॉमच्या माध्यमाने झाला.

'कुलभूषण यांच्या कुटुंबीयांची भेट हा ड्रामा'
SHARES

पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय नौदलाच्या माजी कमांडर कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची अखेर भेट झाली आहे. सोमवारी कुलभूषण जाधव यांची आई आणि त्यांची पत्नी इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात त्यांना भेटले. पाकिस्तानने जरी कुलभूषण जाधव यांना आई आणि पत्नीला भेटू दिले असले, तरी ज्या पद्धतीने ही संपूर्ण भेट पार पडली, त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


काचेतूनच भेटले कुलभूषण जाधव

सोमवारी सकाळी कुलभूषण जाधव यांना त्यांची आई आणि पत्नी तब्बल दीड वर्षानंतर भेटली. यावेळी कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई आणि पत्नीमध्ये काचेची भिंत होती. अर्धा तास ते ४० मिनिटे जो काही संवाद झाला, तो संपूर्ण संवाद हा इंटरकॉमच्या माध्यमाने झाला. दोघे एकमेकांना दिसत होते, मात्र त्यांना स्पर्श मात्र करू शकत नव्हते. त्याचबरोबर संपूर्ण रूममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे भेटीच्या नावावर जे काही पाकिस्तानने केले, त्याने कुलभूषण जाधव यांचे मित्र चांगलेच नाराज झाले आहेत.

कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही एकांत (privacy) देण्यात आली नव्हती. दोघांमध्ये काचेची भिंत होती. पाकिस्तानकडून आम्ही याची अपेक्षा केली नव्हती. भेटीच्या फोटोमध्ये कुलभूषण जाधव यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूच्या नसा दिसत असून त्यांचा छळ झाल्याचं दिसत आहे.

शुभ्रतो मुखर्जी, कुलभूषण यांचे मित्र

भेटीच्या वेळी कुलभूषण जाधव, त्यांची आई आणि पत्नीसह पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त जे. पी. सिंग हे देखील उपस्थित होते.


नेमकं काय आहे प्रकरण?

३ मार्च २०१६ ला बलुचिस्तानच्या सीमेवरून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर कुलभूषण हे भारतीय गुप्तहेर संस्था 'रॉ'चे हेर असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. कुलभूषण जाधव यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्यात पाकिस्तानच्या रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. नौदलातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांनी व्यवसाय सुरु केला होता. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा