मदत मिळाली, पण कारवाई कधी?


मदत मिळाली, पण कारवाई कधी?
SHARES

मुंबई - कुर्ल्यातील हॉटेल सिटी किनारा चायनीज रेस्टॉरंटमध्ये 15 ऑक्टोबर 2015 रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास झालेली दुर्घटना आठवली तर आजही मुंबईकरांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागाला होता. या विद्यार्थ्यांच्या पालकांना तब्बल एक वर्ष चार महिन्यांनंतर एक लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे.

या दुर्घटनेप्रकरणी मालक आणि हॉटेल चालकाला दोषी ठरवत त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर असून त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे. या प्रकरणात जे कुणी, अनधिकृत बांधकामास परवानगी देणारे अधिकारी, अनधिकृतपणे सिलेंडर पुरवणारी यंत्रणा अशा सर्वांनाच शिक्षा व्हावी, अशी  मागणी दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. सोमवारी, 27 फेब्रुवारीला यासंबंधीची सुनावणी पार पडली. या सुनावणीत लोकायुक्तांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाखाची मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

आर्थिक मदतीसाठी हा लढा देत नाही, मुलांच्या जिवाची किंमत एक लाख रुपये नाही. पण अशा घटना पुढे होऊ नयेत, ही वेळ इतर पालकांवर येऊ नये यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न व्हावेत आणि आमच्या मुलांच्या मृत्यूस जे कारणीभूत आहेत, त्या सर्वांना शिक्षा व्हावी यासाठीच लढत असल्याची प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. दरम्यान आता आर्थिक मदत जाहीर झाली असली तरी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रत्यक्षात ही मदत या कुटुंबियांना मिळणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा