अखेर 'त्या' मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलले

 Kurla
अखेर 'त्या' मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलले
Kurla, Mumbai  -  

कुर्ला - तब्बल दोन महिन्यांनंतर टिळक नगर पोलिसांना एका १२ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पार्सल विभागाला लागून असलेल्या एका निर्जन ठिकाणी ९ जानेवारीच्या रात्री एका लाल सुटकेसमध्ये टिळक नगर पोलिसांना १० ते १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. 

दोन महिन्याच्या अथक प्रयत्नांनंतर टिळकनगर पोलिसांनी शिवनाथ सहानी (३६), रेणूदेवी सहानी (३५), कृष्णा सहानी(२८), रणविजय सहानी (२०), विनय सहानी (३३) आणि रामनंद सहानी (४५) या सहा आरोपींना अटक केली आहे. झटापटीमध्ये या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या आरोपींनी लाल सुटकेसमध्ये भरून हा मृतदेह लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात टाकला होता. पोलिसांनी बॅगवरील कंपनीच्या लोगोचा अधार घेत या आरोपींना अटक केली आहे. तर पोलिसांनी मुलाची देखील ओळख पटवली असून त्याचे नाव रणधीर सहानी (१२ ) असल्याचे समोर आले आहे. कामासाठी तो यातील मुख्य आरोपी शिवनाथ सहानी याच्याकडे राहत होता. दरम्यान पोलिसांनी सहाही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Loading Comments