महिला कारचालकाची पोलिसांवर दादागिरी


SHARES

आजपर्यंत आपण पोलिसांनी केलेल्या अरेरावीचे, मारहाणीचे व्हिडिओ पाहिले असतील. त्यावरुन पोलिसांबद्दल आपल्या मनात विशिष्ट अशी प्रतिमाही तयार झाली असेल. मात्र 'मुंबई लाइव्ह'कडे एक असा व्हिडिओ आला आहे ज्यामध्ये पोलिसांबद्दल नाही तर सामान्य नागरिकांबद्दलच वेगळी प्रतिमा तयार व्हावी. या पोलीस नाही तर एक कारचालक महिलाच पोलिसांवर अरेरावी करत असल्याचं दिसून येतंय.

या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या कारचालक महिलेला नाकाबंदीदरम्यान तपासणीसाठी ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. ट्रॅफिकचे नियम का तोडले अशी विचारणा केली. मात्र पोलिसांच्या प्रश्नांना सरळ उत्तरं देण्याऐवजी ही महिला उलट पोलिसांवरच अरेरावी करू लागली. एवढंच नाही तर कारच्या दरवाज्याजवळ उभं राहून प्रश्न विचारणाऱ्या महिला पोलिसाला या महिला कारचालकानं सरळ रस्त्यावर ढकलून दिलं आणि थेट घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानंतर या महिलेच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि मोटर व्हेईकल अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी नेहमीप्रमाणे पोलीस नाकाबंदी करत वाहनांचा तपास करत होते. त्याच दरम्यान ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या दिशेने गाडी चालवत असल्याचे महिला पोलिसांनी पाहिले. त्यामुळे पोलिसांनी महिलेची गाडी अडवत तिला विचारणा केली आणि दंड भरण्यास सांगितले. मात्र त्या महिला चालकाने चुकी मान्य न करता उलट महिला पोलिसाला धक्का देत पळ काढला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा