बस अपघातात महिलेचा मृत्यू

 Mumbai
बस अपघातात महिलेचा मृत्यू
बस अपघातात महिलेचा मृत्यू
बस अपघातात महिलेचा मृत्यू
See all

चीरा बाजार - लक्झरी बसच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा अपघात झाला आहे. जग्गनाथ शंकर शेठ मार्गावर गुरुवारी ही घटना घडली. बसच्या धडकेत हिराबाई कोळी या गंभीर जखमी झाल्या. मात्र उपचारासाठी जीडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. पी केट रोड पोलिसांनी बस ताब्यात घेत बसचालकासह एकावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन्ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिरा बाजारमधील रस्ते लहान असल्याने परवानगी नसतानाही सर्रासपणे मोठी वाहने चालवली जातात. त्यामुळे नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.       

 

Loading Comments