वर्दीतल्या दुर्गेने वाचवले वर्दीवाल्याचे प्राण

वांद्रे रेल्वे ब्रीज येथे अॅन्टीचेन स्नॅचिंग पाॅईंटवर रात्रभर मनिषा विसपुते या गस्त घालत होत्या. सकाळी ८.३० च्या सुमारास रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती छाती पकडून बसलेला मनिषा यांना दिसला. मनिषा यांनी त्याची विचारपूस केली असता ते आरे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई किरण सांगळे असल्याचं समजलं.

वर्दीतल्या दुर्गेने वाचवले वर्दीवाल्याचे प्राण
SHARES

आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत कर्तृत्व गाजवत असतात. अापली जबाबदारी पार पाडत असताना एक माणुसकी जपत अापल्या कामातून एक अादर्श उदाहरणही घालून देतात. मुंबई पोलिस दलातील अशाच एका नवदुर्गेच्या माणुसकी जपत केलेल्या कार्याची सध्या पोलिस दलात चर्चा आहे. गस्तीवर असलेल्या खेरवाडी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई मनिषा विसपुते यांनी द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या कडेला वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या पोलिस शिपायाला वेळीच रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचवले.


ड्युटी संपली तरी...

मुंबईत नवरात्रोत्सवाला सुरूवात झाल्यानंतर भुरटे आणि सोनसाखळी चोर रात्रीच्या वेळी दांडियासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष्य करतात. अशा चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अॅन्टीचेन स्नॅचिंग पाॅईंटमध्ये वाढ केली. त्यानुसार वांद्रे रेल्वे ब्रीज येथे अॅन्टीचेन स्नॅचिंग पाॅईंटवर रात्रभर मनिषा विसपुते या गस्त घालत होत्या. सकाळी ८.३० च्या सुमारास रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती छाती पकडून बसलेला मनिषा यांना दिसला. मनिषा यांनी त्याची विचारपूस केली असता ते आरे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई किरण सांगळे असल्याचं समजलं.


उपचारांची नितांत गरज

त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांची नितांत गरज होती.  यावेळी मनिषा यांची ड्युटी संपली होती. मात्र, क्षणाचाही विलंब न करता मनिषा यांनी सहकारी पोलिस शिपाई निकम यांच्या मदतीने सांगळे यांना त्यांच्या गाडीत बसवून वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला कळवत अंधेरीच्या सेवन हिल रुग्णालयात नेलं.

नवीन वाहन चालक 

सांगळे यांना वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांची प्रकृती आणखी खालावली असती, असं डाॅक्टरांनी सांगितलं. मनिषा या नवीन वाहन चालक आहेत. तरीही मोठ्या धैर्याने त्यांनी सांगळे यांना वेळीच मदत करत त्यांचे प्राण वाचवले.  कामगिरीबाबत मनिषा यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



हेही वाचा - 

गुरू साटमच्या ५ हस्तकांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर

चेंबूरच्या डाॅक्टरला रवी पुुजारीने धमकावले




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा