सायबर चोरीत वेळीच पोलिसांची मदत घ्याल, तर तुमचे पैसे नक्की वाचतील

वर्षभरात मुंबईकरांचे फसवणूकीतले १५ कोटी पोलिसांनी वाचवले

सायबर चोरीत वेळीच पोलिसांची मदत घ्याल, तर तुमचे पैसे नक्की वाचतील
SHARES

सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांचे बँक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणूकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. २०२० मध्ये वर्षभरात अशा प्रकारे १५ कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात फसवणूक त्यांची जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहे. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त(गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तात्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे १५ कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याचा काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला गोल्डन हवर्स म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्य होते. २०२०  या वर्षभरात एकूण १५ कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ईमेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाज माध्यांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक कुठल्याही प्रकारात सायबर या प्रकरणांमध्ये फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्यावेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते. याबाबत माहिती देताना अधिका-याने सांगितले की, सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येई पर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधीत खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात.

मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे पोलिसांनी वाचवले.

कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तात्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती. त्यावेळी राग अनावर झालेल्या सर्जीलने भाऊ सैफ याला जोरदार धक्का मारला. त्यावेळी सैफ हा मागच्या बाजूस डोक्यावर पडला. यात सैफ गंभीर जखमी झाल्याने त्याला जवळील सायन रुग्णालयात हजर करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान सैफचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सैफची पत्नी नाहिद सैफ खान हिच्या तक्रारीनुसार माहिम पोलिसांनी  कलम ३०२ भा.द.वी अंतर्गत गुन्हा नोंदवून सर्जील याला अटक केली आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा