'अरुणभवर गुन्हा दाखल करा नाही तर कारवाईला सामोरे जा'


'अरुणभवर गुन्हा दाखल करा नाही तर कारवाईला सामोरे जा'
SHARES

अंधेरी - टिव्हिएफ संस्थापक अरुणभ कुमारवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार करुन अद्यापही कोणताही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने वकील रिझवान सिद्दीकी यांच्या रागाला सीमा राहिलेली नाही.

कर्मचारी महिलांचा कथित लैंगिक छळ केल्याच्या आरोपा प्रकरणी अरुणभवर 24 तासात गुन्हा दाखल न केल्यास पोलिसांवरतीच करवाई करण्याची मागणी वकील रिझवान सिद्दीकी यांनी केली आहे. या, प्रकरणात नुसती चौकशी न करता एफआयआर दाखल करून सविस्तर चौकाशीची गरज आहे. पण, पोलीस टाळाटाळ करत आरोपीला पुराव्यांशी हेराफेर करण्यास वेळ देत असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे.

पोलिसांनी 24 तासात गुन्हा दाखल न केल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्थानिक डीसीपी यांच्या विरुद्ध क्रिमिनल तक्रार दाखल करण्याची धमकीही सिद्दीकी यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी टिव्हीएफच्या माजी कर्मचारी महिलेने अरुणभवर विनयभंगाचा आरोप केला होता. या महिलेचा हा ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. एवढेच नाही तर यानंतर इतर महिलांनी देखील सोशल मिडियावर अरुणभ कडून त्यांना करण्यात आलेल्या छळाची माहिती दिली होती. त्यानंतर रिझवान सिद्दीकी नावाच्या वकिलाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अरुणभ विरोधात तक्रार केली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा