सिलिंडर स्फोटानं घेतले मानखुर्दमध्ये 3 बळी


SHARES

मानखुर्द - सिलेंडरचा स्फोट झाल्यानं महाराष्ट्रनगरच्या साईबाबा चाळीतली 4 घरं जमीनदोस्त झाली. या स्फोटात तिघे ठार असून 15 जण जखमी झाले आहेत.

यामधील जखमींना गोवंडीतल्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गॅसच्या सिलिंडरमधून आधीपासूनच गळती होत होती. 15 डिसेंबरला सकाळी चहा करण्यासाठी गॅस पेटवायला लाइटर क्लिक करताच स्फोट झाल्याचं पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी सांगितलं. या स्फोटामुळे जवळपासची 4 घरंही जमीनदोस्त झाली. त्यामुळे 4 मुलांसह 15 जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांचा शताब्दी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशम दल, महापालिका कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगारा उपसून मदतकार्य सुरू करण्यात आलं.
मृतांची नावं -
1.रेखा वानखेड़े
2.संजय वानखेड़े
3.कस्तुरबा गांधी

संबंधित विषय