थिएटर्स, हॉटेलवर वैधमापन विभागाची कारवाई

 Pali Hill
थिएटर्स, हॉटेलवर वैधमापन विभागाची कारवाई

नरिमन पॉइंट - उत्पादनावर वेगवेगळ्या किमती छापून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या थिएटर्स आणि हॉटेलवर वैधमापन नियंत्रण विभागानं कारवाई केलीय. याबाबत राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली इथं राज्यातल्या ग्राहकांनी तक्रार केली होती. त्यानुसार राज्यातल्या 345 चित्रपटगृहांची विशेष पोलीस महानिरीक्षक आणि अमिताभ गुप्ता, विशेष महानिरीक्षक, वैधमापन विभाग यांनी तपासणी केली. यात 134 दुकानांवर वैधमापन शास्त्र अधिनियमा अंतर्गत खटले नोंदवण्यात आले.

एकाच उत्पादनावर दोन वेगवेगळ्या किंमती छापल्याप्रकरणी 24, छापील किमतीपेक्षा जादा दरानं विक्री केल्याबाबत 65 आणि इतर उल्लंघनाबाबत 45 जणांविरोधात खटले दाखल करण्यात आलेत. यात प्रामुख्यानं हिंदुस्थान कोकाकोला प्रायवेट लिमिटेड, पेप्सिको इंडिया प्रायवेट लिमिटेड, रेडबुल इंडिया, युरेका फोर्ब्स, अॅग्रो फूड्स या कंपन्यांचा समावेश आहे.

Loading Comments