वासनांध नराधमाला आजन्म कारावास


वासनांध नराधमाला आजन्म कारावास
SHARES

अंधेरी - पश्चिम उपनगरात हाहाकार माजवणाऱ्या नराधमाला अखेर त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. २०१४ साली एका १० वर्षीय मुलीचे शाररिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने अयाज मोहम्मद अली अन्सारी(३५) उर्फ काण्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाच्या पॉस्को सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी अयाज अन्सारीला बलात्कार, अपहरण तसेच बालकायदा ४, ८, १२ अंतर्गत दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अन्सारीवर एकूण १४ मुलींवर शारीरिक अत्याचार केल्याचे गुन्हे नोंद आहेत. त्यातील आंबोली पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणांमध्ये त्याला सोडून देण्यात आलं होतं.

१७ जानेवारी २०१४ साली अयाज मोहम्मद अली अन्सारीने जुहू गल्ली परिसरातून एका १० वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. "या सगळ्याच केसेस अतिशय संवेदनशील होत्या. १० वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आम्ही १२८ पानी आरोपपत्र दाखल केले होते. आजच्या या निकालाने आमच्या प्रयत्नांचं खऱ्या अर्थाने चीज झालं, असं मत डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी व्यक्त केलं.

२०१४च्या सुरुवातीला मुंबईत एका मागून एक लहान मुलींना लक्ष केलं जात होतं. कोणी अनोळखी इसम या मुलींना हेरून त्यांना आपल्या वासनेचा बळी बनवत होता. जोगेश्वरी, अंधेरी, जुहू, सांताक्रूझ अशा सगळ्याच ठिकाणी या नराधमाने लहान मुलींना लक्ष केले होते. एकीकडे रोज अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत होते आणि दुसरीकडे हा नराधाम मात्र मोकाटच होता. शेवटी मुंबई पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून या नराधमाला खार येथून अटक केली होती. त्यानंतर हे बलात्काराचं सत्र थांबलं होतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा