धावत्या रेल्वेवर दगड मारल्यास थेट जन्मठेप!


धावत्या रेल्वेवर दगड मारल्यास थेट जन्मठेप!
SHARES

पश्चिम रेल्वेवर चालत्या गाडीवर दगड भिरकावण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे या पुढे धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी आणि लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर यापुढे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवले जातील, असेही म्हटले आहे.


हेही वाचा

लोकलवर दगड मारल्याने गार्ड जखमी


लोहमार्गाशेजारील झोपड्यांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात. मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.

जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर असे 34 प्रकार घडले आहेत. दगड भिरकावणारा माथेफिरू किंवा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला प्रसंगी 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा कारावास होऊ शकतो. या कायद्याची तरतूद रेल्वे कायद्यांंतर्गत आहे. गेल्या काही महिन्यांत पश्चिम रेल्वे मार्गावर गाडीवर दगड मारण्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे जे कोणी असे प्रकार करत आहेत, त्यांच्यासाठी हा एक इशारा देण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी के. एन. डेव्हिड यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा