लाइट कॅमरा आणि.... चोरी !


  • लाइट कॅमरा आणि.... चोरी !
SHARE

बॉलिवूड चित्रपटांच्या शुटींगचा बनाव करून कॅमेरा भाड्याना घेऊन त्याची विक्री करणाऱ्या दोघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. चिंतन देसाई आणि गौरव कुलकर्णी अशी या दोन आरोपींची नावे असून, त्यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून 9 लाखांची रोकड आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांसोबत लेन्स पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या दोन्ही आरोपींमधील एक आरोपी हा फोटोग्राफर आहे तर दुसरा व्हिडिओग्राफर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. 6 एप्रिलला विजय नावाच्या व्यक्तीने या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या