लांबी वाढवलेल्या दोन कार आरटीओच्या ताब्यात


लांबी वाढवलेल्या दोन कार आरटीओच्या ताब्यात
SHARES

लांबी वाढवलेल्या दोन कार अंधेरी आरटीओने जप्त केल्या आहेत. यापैकी एक कार मुंबईत शुटींगसाठी आणण्यात आली होती. परवानगी न घेताच कारची लांबी वाढविल्यामुळे या कार जप्त केल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे.

अंधेरी पश्चिमेकडील आरटीओ अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आलिशान कार नुकत्याच जप्त केल्या आहेत. त्यापैकी एका कारची नोंदणी पंजाबमधील आहे. 'निसान टिएना एक्स एल' मॉडलची ही कार मुंबईत शुटींगसाठी आणण्यात आली होती. या कारची लांबी वाढवून त्यात बार, एलईडी लाईट्स, एलईडी स्क्रीन, फ्रिज इ. सुविधा बसविण्यात आल्या आहेत.

तर, दुसरी कार क्रिस्लर या परदेशी कंपनीची असून तिचीही लांबी वाढविण्यात आली आहे. ही कार दिल्लीतून मुंबईत आणण्यात आली होती.

यासंदर्भात अंधेरी आरटीओचे अधिकारी आनंद राम वागळे म्हणाले की, या दोन्ही कारच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे या कार जप्त करण्यात आल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा