रुग्णालय की दारूचा अड्डा?

गोवंडी - पालिकेचं शताब्दी रुग्णालय अक्षरशा दारुचा अड्डा बनलंय. या रुग्णालयाला दारूचा अड्डा बनवलंय इथल्या काही कर्मचाऱ्यांनी. शताब्दी रुग्णालय हे पूर्व उपनगरातील एकमेव असं रुग्णालय आहे. जर इथं असे प्रकार होत असतील तर शिवसेना आपल्या स्टाईलन आंदोलन करेल असा इशारा शिवसेना उपशाखाप्रमुख रामचंद्र पवार यांनी दिलाय.

पार्ट्या सुरु झाल्यानंतर त्या रात्री उशिरापर्यंत चालत असल्याची माहिती एका कर्मचार्यांनं नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. मात्र आता रुग्णालय यातील दोषींवर कारवाई करतंय की त्यांच्या चुकीवर पांघरूण घालतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Loading Comments