सुरक्षेला 'तडे'

 BMC office building
सुरक्षेला 'तडे'
सुरक्षेला 'तडे'
सुरक्षेला 'तडे'
See all

परळ - भोईवाड्यातल्या जेरी बाई वाडिया मार्गावरील भीमनगर वस्तीतले रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. ही वस्ती टेकडीवर वसलेली आहे. सुरक्षितेसाठी टेकडीला संरक्षण भिंती बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र पावसाळ्यात या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे ही टेकडी खचत चालली आहे. टेकडी कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठ वर्षांपासून ही वस्ती पुनर्विकासाच्या कचाट्यात सापडली आहे. पुनर्विकासाचा मुद्दा पुढे करून पालिका आणि लोकप्रतिनिधींनी हात झटकले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

Loading Comments