लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

गुरूवारी एका दिवसात ६५ हजार ७३२ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली असून अवैध तस्करी करणाऱ्या ७७७२ जणांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे ही नोंदवलेले आहेत.

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल
SHARES

राज्यात अनलाँकडाऊन सुरू झाले असून सरकारने अनेक नियमात शितीलता आणली आहे. राज्याच्या मद्यविक्रीवरील ही निर्बंध सरकारने उठवल्याने ३३ जिल्ह्यात सध्या दारूची आँनलाईन विक्री केली जात आहे. १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिल्याने राज्याच्या तिजोरीत कमालीची भर पडलेली आहे. गुरूवारी एका दिवसात  ६५ हजार ७३२ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली असून अवैध तस्करी करणाऱ्या ७७७२ जणांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे ही नोंदवलेले आहेत.

हेही वाचाः- वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

  राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल १३ लाख ६४ हजार ०३६ ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७ हजार ८८० अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. १० जून २०२० रोजी राज्यात ९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.१६.८३ लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर २४ मार्च, २०२० पासुन १०जून २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ७८८० गुन्हे नोंदविण्यात आले असून ३६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६९५ वाहने जप्त करण्यात आली असून रु.१९.५० /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचाः- आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन

राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु १,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा