Corona virus: लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन सुरुच, राज्यात 40 हजार गुन्हे दाखल


Corona virus:  लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन सुरुच, राज्यात 40 हजार  गुन्हे दाखल
SHARES
वारंवार बजावूनही अनेकांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नाहीये. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे, मात्र अनेकजण निष्काळजीपणा दाखवत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. राज्यात आतापर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 40 हजार 242 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पोलिसांनी 26 हजार 474 वाहने जप्त करत कारवाई केली आहे.

बुधवारी एकट्या मुंबईत 2470 गुन्हे दाखल करण्यात आल्या आहेत.  त्यातल्या 509 लोकांनी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. मुंबईत 20 मार्च पासून 5 हजार 321 लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवले असून 3985 जणांना अटक करून त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे.  1077 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे.

तर राज्यात विलगीकरणाचे आदेश धुडकावत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची संख्या 438 इतकी आहे.  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी जमावबंदीला परवानगी नाही. मात्र लोक एकत्र जमून या नियमांचं उल्लंघन करत आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे, आतापर्यंत पोलिस स्थानकात अनेक तक्रारी येत आहेत यातल्या बहुतांश तक्रारी या लोक एकत्र जमून नियमांचे उल्लंघन करण्याबदद्ल आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या राज्यभरातील विविध दंडात्मक कारवाईतून सरकारच्या तिजोरीत लाँकडाऊनमध्ये ही 1 कोटी 43 लाख 15524 रुपयांची भर पडलेली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा