Lockdown: अफवा पसरवणाऱ्या 395 जणांंवर गुन्हे दाखल, 211 जणांना अटक


Lockdown: अफवा पसरवणाऱ्या 395 जणांंवर गुन्हे दाखल, 211 जणांना अटक
SHARES
लॉकडाऊनच्या काळात  सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज आणि  भितीचे वातावरण आहे. त्यामुळे मोबाइलवर आलेला निनावी मेसेज खाञी न करताच धोक्याचे ठरू शकते. सोशल मिडियावर सध्या राज्याचे सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. सोशल मिडियावर अफवा पसरवणाऱ्या 395 जणांवर आतापर्यंत त्यांनी गुन्हे नोंदवले असून या गुन्ह्यात 211 जणांना अटक केली आहे.

सोशल मिडियावर चुकीचे मेसेज पसरवणे, टिकटाँकवर वादग्रस्त व्हिडिओ तयार करणे, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 395 गुन्ह्यांची (ज्यापैकी 17 N.C आहेत) नोंद 17 मे 2020 पर्यंत झाली आहे. 

 गुन्ह्यांचे विश्लेषण
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 169 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 154 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी 18 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 43 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 211 आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .



ऑनलाईन व्यवहारात खबरदारी

कोरोना संसर्गामुळे सध्या अनेकांनी घराबाहेर पडणे टाळत, आँनलाईन शाँपिंगवर भर दिला आहे. माञ कोणतिही खरेदी करताना, नागरिकांनी विशेषता काळजी घ्यावी. त्याच बरोबर बँकेतून आलेल्या निनावी फोनवर स्वत:च्या बँक खात्याविषयी कोणतिही माहिती  देऊ नये. अनेक गुन्ह्यांच 8 ते 17 या वयोगटातील मूले,  स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करत आहेत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेषतः पालकांना विनंती करते कि कृपया आपले पाल्य ऑनलाईन काय व कोणती वेबसाईट्स सर्फ करतात यावर लक्ष ठेवा. आपल्याला कुणी फसवल्यास किंवा ञास देत असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये ताबडतोब तक्रार द्या किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवा असे आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिस अधिक्षकांनी केलं आहे .
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा