अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या प्रियकराला अटक

 Sewri
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या प्रियकराला अटक
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या प्रियकराला अटक
See all

लग्नाचे अामिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात शिवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी शिवडीतल्या इंदिरा नगर येथे राहणाऱ्या अमोल कांबळे (22) नावाच्या प्रियकराला अल्पवयीन प्रेयसीसह शिवडी पोलिसांनी रत्नागिरीच्या लांजा मार्केटजवळ शनिवारी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर न्यायालयाने सोमवारी त्याची जामिनावर सुटका केली आहे.

शिवडी पूर्व येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शेजारी राहणाऱ्या अमोल कांबळेशी गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याची विभागात कुणकुण होती. 11 एप्रिल 2017 रोजी दुपारी 3 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी संध्याकाळी घरी परतलीच नाही. ते पाहून धास्तावलेल्या आई-वडिलांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी शिवडी पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली. 

तक्रार दाखल होताच शिवडी पोलिसांनी गुप्त माहितीदाराकडून मुलीची आणि तिच्या प्रियकराची माहिती मिळविली असता तो रत्नागिरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ शिवडी पोलिसांनी रत्नागिरी मधील लांजा मार्केट गाठले आणि दोघांना ताब्यात घेतले. त्याच्यावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयाने जामिनावर सोडले असल्याची माहिती शिवडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नावगे यांनी दिली.

Loading Comments