ट्रॅफिक जॅम सुटता सुटेना

 Lower Parel
ट्रॅफिक जॅम सुटता सुटेना
ट्रॅफिक जॅम सुटता सुटेना
ट्रॅफिक जॅम सुटता सुटेना
See all

लोअर परळ - गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या लोअर परेलमध्ये आता वाहतूक कोंडी रोजचीच झाली आहे. रोजच होणाऱ्या या कोंडीमुळे स्थानिकांचीही कोंडी होत असल्यानं ते चांगलेच त्रस्त झालेत.

काही वर्षांपासूनच या विभागात मोठ्या प्रमाणात ही समस्या जाणवू लागलीये. गणपतराव कदम मार्ग, सेनापती बापट मार्ग, तुलसी पाइप रोड आणि बाबाजी जामसांडेकर मार्ग हे चारही मार्ग एकाच वेळी पूर्णपणे ब्लॉक होत असल्यानं वाहतूक कोंडी होते. पाच महिन्यांपूर्वी स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी ठिकठिकाणी होर्डिंग लावून आणि फेसबुकवर पोस्ट करून नागरिकांकडून कोंडी फोडण्याचे उपाय सुचवा असं म्हणून संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. ही कोंडी फोडण्यात आमदार आणि वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवासी सर्वेश राऊत यांनी मुंबई लाइव्हला दिली.

Loading Comments