अश्लील व्हिडिओ काढून विवाहितेला धमकावणारा पोलिसांच्या ताब्यात


अश्लील व्हिडिओ काढून विवाहितेला धमकावणारा पोलिसांच्या ताब्यात
SHARES

विवाहितेच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देणाऱ्यास एल.टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. विजय पवार असं या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


विवाहितेच्या नकळत बनवली क्लिप

वांद्रेच्या एसआरए इमारतीत पती आणि दोन मुलांसोबत राहणारी पीडित महिला ही विविध खासगी कंपनीत सफाई कामाला जात होती. काही वर्षांपूर्वी पतीला अर्धांगवायूचा झटका आल्याने घराची संपूर्ण जबाबदारी पीडितेवर पडली. याचदरम्यान तिची ओळख विजय पवार याच्यासोबत झाली. विजय हा एका खासगी कंपनीत आॅफीस बाॅय म्हणून कामाला होता. काही दिवसांतच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या दरम्यान दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबध झाले. त्यावेळी विजयने विवाहितेच्या नकळत मोबाइलवर व्हिडिओ क्लिप बनवली होती.


विजय विरोधात तक्रार

कालांतराने महिलेेला विजयचे वागणे चुकीचं वाटू लागल्याने तिने विजयला यापुढे न भेटण्यासाठी सांगितलं. तसंच विजयचे फोन ही उचलण्यास तिने बंद केल्यानंतर विजयने ती व्हिडिओ क्लिप पीडित महिला काम करत असलेल्या कंपनीच्या मालकाला आणि पीडित महिलेला पाठवून शरिरीक संबध ठेवण्यास दबाव टाकू लागला. रोजच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने विजय विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर एल.टी.मार्ग पोलिसांनी विजय विरोधात ३५४ (अ), (क), (ड), ५०४,६६(इ), ६७, ६७(अ) आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने विजयला १९ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा