भरधाव कारला अपघात

वडाळा - शुक्रवारी रात्री मुंबईत पुन्हा एकदा भरधाव वेगातल्या आर्टिगा गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीचालक जखमी झाला. मात्र गाडीतले सहा प्रवासी सुदैवानं बचावले.

ही गाडी ईस्टर्न फ्री वे मार्गानं रात्री एकच्या सुमारास सीएसटीहून चेंबूरला जात होती. दरम्यान, वडाळ्याजवळ या भरधाव गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे या गाडीनं उभ्या असलेल्या झेन कारला धडक दिली. त्यानंतर ती दोन कोलांट्या घेत डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारचं खूप नुकसान झालं. तसंच कारचालकही जखमी झाला.

Loading Comments