नोकरीचं आमिष दाखवून चोराला अटक

  Mumbai
  नोकरीचं आमिष दाखवून चोराला अटक
  मुंबई  -  

  वांद्रे - मुंबईत वांद्रे पोलिसांनी एका चोराला नोकरीचं आमिष दाखवून अटक केलीय. रमणकुमार मिश्रा असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. १८ जुलैला वांद्र्याच्या रिलायन्स मॉलमध्ये ९ लाखांची रोकड चोरण्यात आली होती. मॉलच्या सीसीटीव्हीमध्ये मॉलमधील एका छत्रीचा आडोसा घेऊन रोकड चोरी करण्यात आली होती. या सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसत नव्हता मात्र चोराची चालण्याची पद्धत मॉलमधील सुरक्षारक्षक रमणकुमार मिश्रा याच्याशी मिळती जुळती होती. मात्र रमणकुमार आपला फोन बंद करून बसल्यानं आणि त्याचा पत्ता नसल्यानं पोलिसांना त्याला पकडण्यात यश मिळत नव्हतं. पण पोलिसांनी एक शक्कल लढवत त्याला नोकरीसंबंधी मेसेज केला आणि पोलिसांच्या याच जाळ्यात अखेर रमणकुमार फसला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.