मुंबईत पोलिसांची कठोर कारवाई, दिवसभरात ६ हजार ८० वाहने जप्त

मुंबईतल्या ९४ पोलिसांना त्याच्या परिसरातील मुख्य २ मार्गावर सकाळी ४ आणि संध्याकाळी ४ तास नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबईत पोलिसांची कठोर कारवाई, दिवसभरात ६ हजार ८० वाहने जप्त
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. संचारबंदी असताना ही अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन मुंबई फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढण्यास मदत होत असल्याने पोलिसांनी अशा बेशिस्त नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. घरापासून २ किलोमीटरच्या पुढे गेल्यास पोलिस नाकाबंदीत वाहने जप्त  करत आहेत. सोमवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल ६ हजार ८० वाहने जप्त  केली आहेत.


लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताच, नागरिक मोठ्या संख्येने वाहने घेऊन रस्त्यावर गर्दी करू लागले. बहुदा राज्यशासनाच्या अटीचा त्यांना विसरच पडला असावा. दरम्यान अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलिसांनी आता कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतल्या ९४ पोलिसांना त्याच्या परिसरातील  मुख्य २ मार्गावर सकाळी ४ आणि संध्याकाळी ४ तास नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सोमवारी ठिक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावून तब्बल ६ हजार ८० वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बिनकामाचे बाहेर पडण्यावर चाप बसवण्यासाठी पोलिसांनी ही मोहिम सुरू केल्याचे समजते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश जरी मिळाले असले. तरी धोका अजून टळलेला नाही. ही बाब नागरिकांनी ही विसरून चालणार नाही. राज्य सरकारने नागरिकांना अत्यावश्य गोष्टींसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या दिल्या आहेत. तसेच त्यासाठी काही नियम ही घालून दिलेले आहे. या नियमाचे पालन करणे नागरिकांनी गरजेचे आहे.

कोविड १९ या महामारीचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, शक्यतो घराबाहेर न पडणे, वारंवार हात धुणे या गोष्टी पाळणं आवश्यक आहे असं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी हे आवाहन केलं रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. मेडिकल इमर्जन्सी असेल तरच संचारबंदीच्या काळात बाहेर पडता येईल. घराबाहेर फिरताना मास्क लावणं अनिवार्य आहे. मार्केट, शॉप्स, बार्बर शॉप्स सुरु ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. दोन किमीच्या आतच या ठिकाणी जावं असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. व्यायाम करण्यासाठी संमती देण्यात आली आहे. त्यासाठीची मर्यादाही दोन किमीच आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

या ठिकाणी इतकी वाहने केली जप्त

०झोन १ म्हणजेच   कफपरेड, कुलाबा, मरीनड्राइव्ह, आझाद मैदान, माता रमाबाई मार्ग, डोंगरी,  आणि जेजे मार्ग पोलिस ठाणे परिसरात पोलिसांनी८७५ गाड्या जप्त केल्या आहेत.

०झोन २ म्हणजे  एल.टी.मार्ग. व्हि.पी.रोड, डाँ. डीबीमार्ग, पायधुनी, गामदेवी, मलबार हिल या परिसरात पोलिसांनी ६५४  वाहने जप्त केली आहेत.

० झोन  ३ म्हणजे ताडदेव, नागपाडा, आग्रीपाडा,भायखळा,वरळी, ना.म.जोशी मार्ग परिसरात पोलिसांनी ३९२ वाहने केली जप्त केली.

०झोन ४ म्हणजे काळाचौकी, भोईवाडा, माटुंगा, सायन, आर.ए.किडवाई, वडाळा, अँण्टाप हिल परिसरात पोलिसांनी ४३० वाहने केली जप्त

 ० झोन ५ म्हणजे दादर, शिवाजीपार्क, माहिम, शाहू नगर, धारावी, कुर्ला, विनोबा भावे नगर, परिसरात पोलिसांनी १५९ वाहने जप्त केली.

० झोन ६ म्हणजे चेंबर, नेहरूनगर, चुन्नाभट्टी, गोवंडी, ट्राँम्बे, आरसीएफ, मानखुर्द, देवनार, शिवाजीनगर, टिळक नगर परिसरात पोलिसांनी ११३८ वाहने जप्त केली

० झोन ७ म्हणजे नवघर, कांजूरमार्ग, भांडुप,  पार्कसाईट,  मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, पंतनगर परिसरात पोलिसांनी २२३ वाहने केली जप्त

० झोन ८ म्हणजे वांद्रे (बीकेसी), खेरवाडी,निर्मलनगर,वाकोला,विलेपार्ले, सहार व विमानतळ  परिसरात पोलिसांनी १८७ वाहने केली जप्त

० झोन ९ म्हणजे वांद्रे (पश्चिम), खार, सांताक्रूझ, जुहू, डि.एन.नगर, वर्सोवा, ओशिवरा, अंबोली या परिसरात पोलिसांनी ५८२ वाहने जप्त केली

० झोन १० म्हणजे साकीनाका, पवई, अंधेरी, जोगेश्वरी, मेघवाडी,एमआयडीसी, परिसरात पोलिसांनी सर्वाधिक म्हणजेच ४६१  वाहने जप्त केली.

० झोन ११ म्हणजेच मालवणी,बोरिवली, गोरेगाव, मालाड, एमएचबी, चारकोप, बांगूरनगर, गोराई,  कांदिवली मध्ये पोलिसांनी ३८९ वाहने केली जप्त केली.

० झोन १२ म्हणजेच वनराई, आरे , दिंडोशी, कुरार,समतानगर, कस्तुरबा, दहिसर,  मध्ये पोलिसांनी ४१८ वाहने केली जप्त केली.

० पोर्ट झोन म्हणजेच वडाळा, शिवडी, यलोगेट, मुंबई सागरी १, मुंबई सागरी २ परिसरात १७२ वाहने पोलिसांनी केली जप्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय