COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

‘महाराष्ट्र एटीएस’ची मोठी कारवाई, ड्रग्ज तस्करीतून जमावलेल्या मालमत्तेवर आणली टाच

पोलिसांनी या कारवाईत तब्बल १४६ किलो १४३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे.

‘महाराष्ट्र एटीएस’ची मोठी कारवाई, ड्रग्ज तस्करीतून जमावलेल्या मालमत्तेवर आणली टाच
SHARES

ड्रग्ज तस्करीतून कमवलेल्या पैशांच्या जोरावर आरोपींनी उभ्या केलेल्या मालमत्तेवर एटीएसने टाच आणली आहे. पोलिसांनी १३ आरोपींची बॅक खातीही गोठवली असून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सफेमा कायद्यांतर्गत ताब्यात घेतली आहे. आतापर्यंत  एटीएसकडून फक्त अटकेचीच कारवाई केली जात होती. मात्र आरोपींनी तस्करीच्या पैशातून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता उभी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर एटीएसने ही कारवाई केली आहे. 

हेही वाचाः- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदा, उच्च न्यायालयाचा बीएमसीला दणका

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बाँलीवूड आणि मुंबईला विळखा घातलेल्या ड्रग्ज तस्करांची माहीती तपास यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर सर्वच स्तरावरून त्यांची धरपकड सुरू होती, त्याच विशेषता पोलिस आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईत काही मोठे मासे गळाला लागले. त्यात बाँलीवूडशी संबधित व्यक्तींचाही समावेश आहे. या कारवाई सुरू असतानाच, महाराष्ट्र एटीएसच्या विक्रोळी युनिटने मागील वर्षी तब्बल १३ सराईत ड्रग्ज तस्करांना एका कारवाईत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याजवळून १४६ किलो १४३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं.  ज्याची बाजारात किंमत ही काही कोटींमध्ये होती. आरोपींनी या तस्करीतून मोठी संपत्ती बनवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यावर अंकुश आणत ती संपत्तीही सफेमा कायद्यांतर्गत पहिल्यांदाच जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अब्दुल रजाक कादर शेख, इरफान बादर शेख, सुलेमान जोहर शेख, जितेंद्र शरद परमार उर्फ आसिफ, नरेश मदन म्हसकर, सरदार उत्तम पाटील, जुबेर लालमोहम्मद मोमीन, मोहम्मद सलीम अब्दुल हमीद मेमन, कैस कुरेशी सिद्धिकी, आवेश अकबर खान, मोहम्मद तन्वीर अब्दुल आझीस परयानी, मोहम्मद वासीम अब्दुल लतीफ शेख, मुस्तफा जुलफीकार चारानिया उर्फ गुड्डू यांना अटक केली होती. पोलिसांनी या आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले होतं.

हेही वाचाः- ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

यातील मोहम्मद तन्वीर अब्दुल आझीस परयानी हा आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे चौकशीत समोर आल्याने या ड्रग्जमागे अंडरवल्डचा हात असल्याची शक्यता होती. या ड्रग्ज तस्करीतून आरोपींनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केली असल्याचे लक्षात आल्यानंतर एटीएसच्या पथकाने मित्तल कोर्ट, (सफेमा कार्यालय) नरीमपाँईट यांच्याकडे पत्र व्यवहार करून आरोपींची मालमत्ता जप्त केली आहे. अशा प्रकारे आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचीही पहिलीच वेळ आहे. 

आरोपींकडून जप्त केलेली मालमत्ता

पोलिसांनी मोहम्मद तन्वीर अब्दुल आझीस परयानी याच्याकडून तस्करीतून कमावलेले ११३२.४७६ ग्रॅमचे सोनं जप्त केलं आहे. त्यात ७१ ग्रॅम चांदीचाही समावेश आहे.या सर्वाची एकूण किंमतही ४१ लाख३२ हजार ४३८ इतकी आहे. त्याच बरोबर त्याच्याजवळून ७ विदेशी बनावटीची घड्याळे, ज्याची किंमत ३ लाख २० हजार इतकी आहे. तसेत रोख २ लाख १७ हजार १८० रुपये बरोबर ४१० दिरहम, २० अमेरिकन डाँलरअशी मालमत्ता जप्त केली आहे. तर कैस कुरेशी सिद्धीकी याच्याजवळून आकुर्लीरोड पनवेल येथे ४८.५७० चौरस मीटरचा फ्लॅट, २८८ चौरस मीटरचा गाळा, १६०० मीटरचा गाळा अशी ३२ लाख ९३ हजारची संपतीत जप्त केली आहे. त्याच बरोबर सरदार पाटील या आरोपीचा सांगली शिराळा येथे असलेला गाळा आणि सर्व आरोपींची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा