Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

सोमवारी दुपारी शेख राबोडी परिसरात दुचाकीवरून जात होते. यावेळी मागून आलेल्या व हेल्मेट घालेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने शेख यांच्या दिशेने पिस्तूलातून झाडलेली गोळी शेख यांच्या डोक्यात लागली.

ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख त्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने (युनिट १) एका आरोपीला अटक केली आहे. शाहिद लायक शेख (३१) असं या आरोपीचं नाव आहे. अटक आहे. शेख यांच्या हत्येनंतर शूटर्सना कारमधून मालेगावला शाहिद यानेच सोडले होते. ही कार तो टुरिस्टसाठी वापर होता.  

जमील शेख यांची सोमवारी भर रस्त्यात डोक्यात गोळी झाडू हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी शेख राबोडी परिसरात दुचाकीवरून जात होते. यावेळी मागून आलेल्या व हेल्मेट घालेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने शेख यांच्या दिशेने पिस्तूलातून झाडलेली गोळी शेख यांच्या डोक्यात लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हत्येचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलं.

गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून करण्यात येत आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेची तीन पथके दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. राबोडीमधून शाहिद शेख याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुन्ह्यात मारेकऱ्यांसह त्याचाही सक्रीय सहभाग असल्याचं  चौकशीत समोर आलं आहे. न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा-

Mumbai Metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा