अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, देशात कडेकोट बंदोबस्त सुरू असताना. सोशल मिडियावरही पोलिस लक्ष ठेवून होते. त्या संपूर्ण दिवसात पोलिसांनी शेकडो वादग्रस्त पोस्ट आणि ट्विटर हँडल सोशल मिडियावरून हटवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. भारतात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा यासाठी सोशल मिडियावर पाकिस्तानातून ही खलबतं सुरू होती अशी माहिती पुढे आली आहे.
अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीचा निकाल शनिवारी लागला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावरून वादग्रस्त पोस्टमुळे वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच राज्याचे सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना या पोस्ट बंद करण्याबाबत मार्गदर्शन दिले होते. या बैठकीत फेसबुक, इन्स्टाग्रामचे अधिकारी व राज्याच्या विविध जिल्हा प्रमुखांसह ५० पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्याच बरोबर सर्व पक्षाच्या नेत्यांनी या निकालाबाबत देशातील नागरिकांना शांततेचे पालन करण्याचे आवाहन केलं असताना सोशल मिडियावर काही माथेफिरूकडून वादग्रस्त पोस्ट टाकल्या होत्या.
या वादग्रस्त पोस्ट पोलिसांनी तपासल्या असता. त्यातील बहुतांश पोस्ट या पाकिस्तानच्या विविध शहरातून ट्विटर हॅडलद्वारे केल्याचे निदर्शनास आले. असे वादग्रस्त १४१ ट्विटर हँडल पोलिसांनी डिलिट केले आहेत. त्याच बरोबर ट्विटरवर ही पाकिस्ताकडून बाबरी मशिदच्या निर्णयावर वादग्रस्त ड्रेड सुरू केला होता. त्यात #BabriMasjid #DamolitionBabriMasjid #UglyIndia #GhazwaEHind # nahichahiye5acre #justiceforindianususlims #RipIndianCiaCiaSiaCragiaTragiaTraisiCrandiSiaCragiaTarisiCrandiCarisiTrajiaTarisiCrandiaCariagarytania #Irjia #ReCIndiaTrisiaTrisiaTrisiaTrisiaTrisia या हॅश टॅगचा वापर करण्यात आला होता. या हॅश टॅगद्वारे पोस्ट करण्यात येणाऱ्या मजकूराला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळत होते. या मजकूरावर सायबर पोलिस बारीक नजर ठेवून असल्याने ते मजकूर वेळीच रद्द केले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.