उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या(एनसीआरबी) २०१९ च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रापाठोपाठ तामीळनाडू, केरळ, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधीक गुन्हे दाखल

उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे
SHARES

देशात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांचा विचार केल्यास त्याबाबत महाराष्ट्र दुस-या स्थानावर आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये पाच लाख नऊ हजार ४३३ गुन्हे दाखल झाले असून याबाबत उत्तर प्रदेश सहा लाख २८हजार ५७८ गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या(एनसीआरबी) २०१९ च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रापाठोपाठ तामीळनाडू, केरळ, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधीक गुन्हे दाखल झाले आहेत. देशातील २९ राज्य व केंद्र शासित प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ही तुलना करण्यात आली आहे.

हेही वाचाः- चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी

गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर असला, तरी प्रति लाख लोकसंख्यामागे दाखल गुन्ह्यांचे प्रमाण पाहिल्यास महाराष्ट्रातील स्थिती चांगली आहे. याबाबत राज्य देशात सहाव्या क्रमांकावर आहे. याबाबत देशात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये प्रति लाखांमागे १२८७.७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ गुजरात(६३१.६), तामिळनाडू (६००.३), हरियाणा(५७७.४) व मध्यप्रदेश(४७८.९)  गुन्ह्यांचा प्रमाण आहे.

बिहार उत्तर प्रदेशपेक्षा राज्य सुरक्षीत

याशिवाय गंभीर गुन्ह्यांचा विचार केला तर देशात हत्यांमध्ये राज्य तिस-या क्रमांकावर आहे. राज्यात २०१९ मध्ये २१४२ हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. याबाबत उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधीक हत्या २०१९ मध्ये गढल्या आहेत. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये २०१९ मध्ये अनुक्रमे ३८०६ व ३१३८ हत्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा