मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावर अनिल देशमुख म्हणाले...

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटक पदार्थ असलेल्या चारचाकी वाहन सापडल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास योग्यपणे सुरू आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावर अनिल देशमुख म्हणाले...
SHARES

मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणी भा.दं. वि. कलम ३०२, २०१ आणि १२० बी नुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याअँटिलिया या घराबाहेर स्फोटकांना भरलेल्या वाहनाच्या मालकाचा मृतदेह आढल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पोलीस तपासाला लक्ष्य करत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत आहे. त्यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास एटीएसकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं आहे. 

मनसुख हिरेन यांचा जीव जाऊ शकतो हे मी आधीपासून सांगत होतो. ते सगळयात महत्त्वाचे साक्षीदार होते. दुर्दैवाने त्यांचा जीव गेला. आता एटीएसने त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मी सांगत होतो, तेच एटीएसच्या तपासात पुढे यायला लागलं आहे. राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं.

याप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारवर मोठी टीका झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर सभागृहात निवेदन दिलं. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटक पदार्थ असलेल्या चारचाकी वाहन सापडल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास योग्यपणे सुरू आहे. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

(maharashtra home minister anil deshmukh reacts on mansukh hiren and antilia case)


हेही वाचा-

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीमालकाचा मृत्यू, गौडबंगाल असल्याच्या फडणवीसांच्या दाव्याने खळबळ

Read this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा