अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीमालकाचा मृत्यू, गौडबंगाल असल्याच्या फडणवीसांच्या दाव्याने खळबळ

या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेले गाडी मालक मनसुख हिरेन यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केलेली असतानाच त्यांचा मृतदेह मुंब्रा इथं सापडल्याची माहिती मिळाली आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीमालकाचा मृत्यू, गौडबंगाल असल्याच्या फडणवीसांच्या दाव्याने खळबळ
SHARES

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील कंबाला हिल परिसरातील अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ गाडी काही दिवसांपूर्वी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील मुंब्रा इथं सापडला असून यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेले गाडी मालक मनसुख हिरेन यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केलेली असतानाच त्यांचा मृतदेह मुंब्रा इथं सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात जे काही योगायोग तयार झालेत, त्यातून संशय निर्माण होत आहे. यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याने हे प्रकरण तात्काळ एनआयकडे वर्ग केलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.

ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली आहे. परंतु मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शंका उपस्थित केली आहे.

हेही वाचा- अंधेरीतील रेस्टॉरंटमधील 'इतके' कर्मचारी कोरोनाबाधित

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडल्यानंतरचा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलिग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आलं, 'जैश उल हिंद' नावाने. त्यात एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिलं होतं. पण तसं कुठलं खातंच नव्हतं. त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या आल्या होत्या. गाड्या ठाण्यातून आल्या होत्या, गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वझे पहिल्यांदा तिथं पोहोचले. नंतर क्राइम, स्थानिक पोलीस ठाण्याचे (mumbai police) आणि इतर लोक आले. 

सचिन वझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. पण तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमून सचिन वझेंना का काढलं? हे समजलं नाही. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला. हा क्रमांक सचिन वझे यांचा असल्याचं समोर आलं आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथं तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. तो कोणाला भेटला, हे शोधल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(devendra fadnavis alleges conspiracy theory behind full of explosive car found in front of mukesh ambani home antilia)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा