मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे

कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. तर कारचा मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करणार आहे.

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांचा साठा असलेली कार सापडली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर या कारचा मालक  मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यूही झाला आहे.  कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे.  केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. तर कारचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करणार आहे.

 कारमध्ये स्फोटके सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत होता. त्यानंतर मनसुख हिरेन व्यापाराचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळल्यानंतर हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आलं. मनसुख हिरेनची पत्नी आणि मोठ्या मुलाने एटीसच्या कार्यालयात दाखल होत हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

२५ फेब्रुवारी रोजी अँटिलिया बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये स्फोटके सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.  या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. या पत्राद्वारे मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकावण्यात आले होते. या घटनेवरून राज्याच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती. आता या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. 

 दरम्यान काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला १ सेंटीमीटर बाय १ सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय १ सेंटीमीटरची लाल खुण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे.

 महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांचेकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा