Exclusive : नेत्याच्या मुलीची बदनामी करणाऱ्यास अटक

काही दिवसांपूर्वी त्यानं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्वतःचे तीन अकाउन्ट बनवले होते. या खात्यावरून त्यानं महाराष्ट्रातील एका बड्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या मुलीला आणि तिच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

Exclusive : नेत्याच्या मुलीची बदनामी करणाऱ्यास अटक
SHARES

महाष्ट्रातील एका नामांकित राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या मुलीच्या नावानं फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवर कमेंट करणाऱ्याला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. राहुल सारीपूत्रा (31) असे या आरोपीचं नाव आहे.


राजकीय नेत्याच्या मुलीविरोधात सोशल मिडियावर कमेंट

मूळचा कोल्हापूरचा रहिवाशी असलेला राहुल सारीपूत्र हा नुकताच 'बीए' पास झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्वतःचे तीन अकाउन्ट बनवले होते. या खात्यावरून त्यानं  महाराष्ट्रातील एका बड्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या मुलीला आणि तिच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. राजकीय नेत्याच्या मुलीनं त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली नाही. मात्र तिच्या मित्रांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यामुळेच राहुल राजकीय नेत्याच्या मुलीच्या नावानं कमेंटकरून तिच्या मित्रांना टॅग करू लागला. ऐवढ्यावरच न थांबता त्यानं तिच्या मित्रांशी संवादही साधला होता. तसंच काही मित्रांना अप्रत्यक्ष धमक्याही दिल्याचं समजतंय. याबाबतची माहिती राजकीय नेत्याच्या मुलीला तिच्या मित्रांनी दिल्यानंतर तिनं संबधित गोष्टीची सत्यता पडताळली. त्यानंतर हा प्रकार उघडक झाला.  


कोल्हापूरातून आरोपीला अटक

याप्रकरणी पक्षातील एका कार्यकर्त्यानं शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी फेयबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट कोल्हापूरातून हाताळलं जात असल्याचं पुढे आलं. पोलिसांनी संबधित खात्याच्या आयपी अॅडरेसच्या मदतीनं राहुल हा नवीन अकाऊंट बनवून कमेंट करत असल्याचं उघडकीस आलं.

शिवाजी पार्क पोलिसांनी राहुल विरोधात 354(ड), 500, 507 भा.द.वि.सह  61(अ), 66(ड), 67(अ) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. त्यानंतर राहुलला 7 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरातून अटक करण्यात आली. आपल्याकडून चुकून ही घटना घडल्याची कबूली राहुलनं पोलिसांना दिली. राहुलला 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.



हेही वाचा

सीआयएसएफच्या जवानाची स्वतःला गोळीमारून आत्महत्या

मुंबई पोलिस आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार


    

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा