मोबाईलने लावला घरातल्या चोरीचा शोध!

मालाड - कपाटातून गायब होणारे पैसे कोण चोरतं याचा शोध घेण्यासाठी मालाडमधील मयुरेश्वर इमारतीत राहणाऱ्या घर मालकिणीने एक अजब शक्कल लढवत मोलकरणीचा पर्दाफाश केला.

अन्नपूर्णा खडसे असं या मोलकरणीचं नाव असून, ती आपल्या मालकिणीच्या घरात चोरी करत होती. मालकिणीने चोर पकडण्यासाठी कपाटाच्या खोलीत मोबाईल रेकॉर्डिंग सुरु करून ठेवला. आणि हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. नवऱ्याने दिलेले पैसे मालकीण कपाटात ठेवत होती. मात्र पैसे चोरी होत होते. ही मोलकरीण 40 हजार रुपये चोरताना कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान या प्रकरणी अन्नपूर्णा खडसे हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Loading Comments