एकतर्फा प्रेमापोटी अॅसिड हल्ला

दिंडोशी - दिंडोशी एसिड कांड प्रकरणात पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीला अटक केलीय. सरफराज अंसारी ( 22 )असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सरफराज अंसारी रफीक मोरबच्या कारखान्यात 10 वर्षांपासून काम करत होता. कारखान्याच्या बाजूलाच चंदन सिंह हा राहत होता. अंसारीचं चंदनची पत्नी चांदनीवर एकतर्फा प्रेम होतं. चांदनी कायमस्वरूपी त्याची व्हावी म्हणून अंसारीनं चंदनचा काटा काढायचं ठरवलं. अंसारीनं चंदनच्या घरी अॅसिड हल्ला केला. त्यामध्ये चंदन 90 टक्के भाजला. तर त्याची पत्नी चांदनी आणि चार वर्षाचा मुलगा आदर्शही जखमी झाला. चंदनवर कस्तूरबा आणि चांदनी,आदर्शवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरूये.

याप्रकरणी साबीरा आणि अशफाक नावाचे दोघं आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं . कोर्टानं त्यांना 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

Loading Comments