कुर्ल्याच्या ठक्कर बप्पा परिसरात आगीचा भडका

कुर्ल्याच्या ठक्कर बप्पा परिसरात आगीचा भडका
See all
मुंबई  -  

कुर्ला - नेहरूनगरच्या ठक्कर बप्पा परिसरात लागलेली आग विझवण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी २ वाजता लागलेली आग अथक प्रयत्नांनंतर विझवण्यात आली. 

चप्पल बनवण्याच्या कारखान्यात ही आग लागली होती. आग इतकी वाढली की आसपासच्या परिसरातील १൦ ते १२ चप्पल कारखान्यांमध्ये ती पसरली. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुरक्षेसाठी या परिसरात राहणाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.