पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात मुंबईतील 11 ठार


पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात मुंबईतील 11 ठार
SHARES

मुंबई - खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळीकांचन येथे ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार अपघातात मृत झालेले प्रवाशी हे मुंबईचे असल्याचे समजते. मुलुंडहून अक्कलकोटला जात असताना या प्रवाशांवर काळाने झडप घातली.

पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ज्योती ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या समोर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रानडुक्कराला उडवून दुभाजक ओलांडून ही बस पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला धडकली.

मृतांमध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका लहान मुलीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मृतांची नावे

विजय काळे

ज्योती काळे

योगेश लोखंडे

जयवंत चव्हाण

योगिता चव्हाण

रेवती चव्हाण

जगदीश पंडित

शैलजा पंडित

प्रदीप अवचट

सुलभा अवचट


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय