पंतनगरमध्ये ३ वर्षाचा मुलगा नाल्यात पडला, शोध सुरू

गुरूवारी दुपारी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत नाल्याच्या शेजारी खेळत असताना. अचानक त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला.

पंतनगरमध्ये ३ वर्षाचा मुलगा नाल्यात पडला, शोध सुरू
SHARES

घाटकोपरच्या पंतनगर परिसरात बाहेर खेळत असलेला ३ वर्षाच्या मुलाचा तोल गेल्याने तो नाल्यात पडला. त्याच्या मित्रांनी ही माहिती घरातल्यांना दिल्यानंतर शोधकार्यास सुरूवात झाली. सध्या स्थानिकांच्या मदतीने पालिका आणि एनडीआरएफचे जवान या मुलाचा शोध घेत आहेत.

घाटकोपरच्या पंतनगर येथील सावित्रीबाई फुले नगरमध्ये हा मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. गुरूवारी दुपारी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत नाल्याच्या शेजारी खेळत असताना. अचानक त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी घरातल्यांना दिल्यानंतर घरातल्यांनी पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी पालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली. मात्र नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ असल्यामुळे शोध कार्यात अनेक  अडथळे येत होते. हे ओळखून पुढे एनडीआरएफ आणि नेव्हीची मदत घेण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि नेव्हीच्या जवानांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा