महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत


महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत
SHARES

नामांकीत बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या महिलेस अश्लील मेसेज पाठवणाऱ्या ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे. चाको क्रिस्टन चार्ल्स असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

मागील अनेक दिवसांपासून आरोपी चाको महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत होता. त्यामुळे पीडित महिलेनं फोन करून आरोपीला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचं गैरवर्तन सुरूच होतं. अनेकदा समजावूनही आरोपी ऐकत नसल्याने कंटाळून पीडित महिलेनं ताडदेव पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत चाकोला बोरिवलीतून अटक केली. चौकशीत चाकोने आपण ट्रू कॉलरहून महिलांचं नंबर मिळवून त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा