सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडवले

 Kandiwali
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडवले
Kandiwali , Mumbai  -  

कांदीवलीच्या समतानगरमधील पोईसर परिसरात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका इसमाने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. महेश बापेरकर असे या ठगाचे नाव असून, त्याने याआधी एका पालिका अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून काम केलेले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महेश बापेरकर हा लोकांना पालिकेमध्ये सरकारी नोकरी लावतो असे सांगून पैसे घ्यायचा. आतापर्यंत त्याने जवळपास 5 जणांना गंडा घातला. विशेष म्हणजे अनेकदा तुमचे काम आज होईल, उद्या होईल असे सांगून तो गंडवलेल्या माणसांना टाळायचा. अखेर कंटाळून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता त्याच्यावर 403,420 आणि 406 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Loading Comments