एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणारा अटकेत


एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणारा अटकेत
SHARES

निनावी फोन करून तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा 12 च्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमास तरुणीने विरोध केल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.


संपूर्ण प्रकार

दहिसर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर आरोपी एकतर्फी प्रेम करायचा. त्याने तरुणीकडे लग्नाबाबच विचारले असता तिने त्याला नकार दिला. याच रागातून आरोपीने जानेवारी 2018 पासून तिला त्रास देण्यास सुरूवात केली. तरुणीला घाबरवण्यासाठी त्याने धमकीचे पत्र पाठवले. त्यावर तरुणी आणि तिच्या आईने दुर्लक्ष केल्याने 25 जानेवारी रोजी आरोपीने घराजवळ 10 दिवसांत 15 लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. कुणी तरी त्रास देण्याच्या हेतून हे सर्व करत असल्यानं दोघींनी त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं. मात्र यासर्वामुळे राग अनवर झालेल्या आरोपीने 28 मे रोजी 15 लाखाच्या खंडणीसाठी तरुणी आणि तिच्या आईला फोन करून त्रास देऊ लागला.


पोलिसांत तक्रार

रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर दोघींनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा पुढे गुन्हे शाखा 12 कडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही केमेऱ्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवत त्याला 48 तासांत अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा