वीज चोराला अटक

  Mazgaon
  वीज चोराला अटक
  मुंबई  -  

  माझगाव येथील प्रभात अपार्टमेन्टमध्ये राहणाऱ्या 44 वर्षाच्या मनीष कक्कर याला सोमवारी पोलिसांनी वीज चोरी प्रकरणी अटक केली. मनीष गेली 10 ते 15 वर्षापासून दर महिन्याला मीटर रिडिंगमध्ये फेरफार करत होता. त्याच्या घरी 3 एसी, गिझर, बॉयलर, टीव्ही, पंखे आणि लाईट्स आहेत.

  मीटरमध्ये फेरफार केल्यामुळे बेस्ट कंपनीला 32 लाख रुपयांचा तोटा झाल्याचे तपासणीतून समोर आले आहे. बेस्ट कर्मचारी महेंद्र शिर्के हे जेव्हा प्रभात आपार्टमेन्टमध्ये वीज मीटर रिडिंग तपासणीसाठी गेले. तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी त्वरित यावर कारवाई करत सगळी माहिती बेस्ट कार्यालय आणि पोलिसांना दिली. वीज मीटरला अटकाव करून विजेची चोरी केल्याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा (2003) चे कलम 135 अंतर्गत मनीष कक्करविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.