भोजपुरी अभिनेत्रीला धमकावणारा अटकेत


भोजपुरी अभिनेत्रीला धमकावणारा अटकेत
SHARES

मालाड परिसरात राहणाऱ्या भोजपुरी सिनेअभिनेत्रीला फेसबुक आणि व्हाॅट्स अॅपवर अश्लील कमेंट पाठवून त्रास देणाऱ्यास मालाड पोलिसांनी अटक केली आहे. संदीप पांडे असं या आरोपीचं नाव असून तो मागील २ महिन्यांपासून तिला त्रास देत होता. शिखाला त्रास देण्याच्या उद्देशाने तो हे करत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं.


संपूर्ण प्रकार

किस्मत कनेक्शन, जिंदगी कैसी एक पहेली या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी शिखा मिश्रा ही अभिनेत्री मालाड परिसरात राहते. मागील दोन महिन्यांपासून तिच्या मोबाइलवर आणि फेसबुकवर अश्लील मेसेज संदीप पांडे टाकत होता. मात्र शिखाने त्याकडे दुर्लक्ष केलं. तरीही अश्लील मेसेज करून तो शिखाला त्रास देत राहिला. या त्रासाला कंटाळून शिखाने याबाबत तिच्या नवऱ्याला सांगितलं. दरम्यान तिच्या नवऱ्याने फोन करून संदीपला जाब विचारला असता आपण शिखाचं अपहरण करून बलात्कार करू अशी धमकी संदीपने दिली.


पोलिसांकडे केली तक्रार

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच, शिखाने मालाड पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी संदीपचा माग काढत त्याला नुकतीच वाशी परिसरातून अटक केली आहे. संदीप हा विवाहित असून दोन मुलांसह वाशी परिसरात राहतो. शिखाला त्रास देण्याच्या उद्देशानेच तो हे करत असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं.


हेही वाचा - 

नवी मुंबईतून 253 किलो केटामाईन जप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा