रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशाला लुटले


SHARE

गोवंडी - कामावरून घरी जात असताना अज्ञातानं सुरेश बिर्जे (38) यांच्यावर हल्ला केला. तसंच त्यांच्या हातातील दोन तोळे सोन्याचं ब्रेसलेटही चोरलं. गोवंडी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. देवनार कॉलनी परिसरात राहणारे बिर्जे रविवारी रात्री नऊच्या सुमारास गोवंडी रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे लाईन पार करून घरी जात होते. याच दरम्यान आरोपीनं त्यांना मारहाण करत मुद्देमाल लंपास केला. याबाबत त्यांनी सोमवारी वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेतायेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या