फुटबोर्डवर बसल्याने गमावला जीव

  मुंबई  -  

  तुम्ही रेल्वेच्या फुटबोर्डवर बसून प्रवास करता का? जर करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण  रेल्वेच्या फुटबोर्डवर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना घडलीय मुंबईच्या बोरीवली रेल्वे स्टेशनवर. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्यं आपण बघू शकता. कशाप्रकारे मेल एक्स्प्रेसच्या फुटबोर्डवर बसून प्रवास करणारे हे वयस्कर इसम प्लॅटफॉर्म आल्याने रेल्वेच्या खाली गेले. ही घटना 28 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 37 मिनिटांनी घडली. एक वयस्कर प्रवासी गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान त्यांची अजून ओळख पटलेली नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.