पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या


पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या
SHARES

पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून एकाची हत्या केल्याचा धक्कादाय प्रकार दादर परिसरात घडला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सुनील पंजाबी (४०) असल्याचं समजत आहे.


काय आहे प्रकरण?

सुनील पंजाबी हा पेंटरचं काम करत असून दादर पश्चिमेकडील एस. जी. जावळे मार्गावरच रहात होता. रविवारी मध्यरात्री अज्ञात इसमाने सुनील पंजाबीच्या डोक्यावर सिमेंटचा पेव्हर ब्लॉकने मारून त्यांची हत्या केली आणि तिथून पसार झाला.

रात्री दीडच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुनीलचा मृतदेह त्याच्या मित्रांना दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी येऊन येऊन सुनीलचा मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरूवात केली.


पैशांवरून वाद?

सुनीलचा पैशांवरून कोणाशी तरी वाद झाला होता. त्यानंतर सुनीलची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा-

९ महिने उलटले तरी अनिकेत बेपत्ताच!

'अशा' गेमपासून सावध रहा!, नाहीतर असं तुमच्यासोबतही घडू शकतं


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा