गोरेगावात शाॅक लागून एकाचा मृत्यू


गोरेगावात शाॅक लागून एकाचा मृत्यू
SHARES

गोरेगाव परिसरात विजेचा धक्का बसल्यानं एका ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. रामसिंगार यादव असं या मृत व्यक्तीचं नाव असून या कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीत निदर्शनास आलं. त्यानुसार वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.

संपूर्ण प्रकार

मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेले रामसिंगार यादव हे मागील अनेक महिन्यांपासून वालभट्टरोडच्या राजीव गांधी नगर येथील कामा इस्टेटमध्ये साई रबर कंपनीत कामाला होते. सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते रबर मोल्डिंग इलेक्ट्राॅनिक हॅडस्प्रे मशीन चालू करण्यासाठी गेले. त्यावेळी विद्युत पुरवठा करणाऱ्या बाॅक्समध्ये चुकीच्या इलेक्ट्रिक वायरच्या जोडणीमुळे मागील अनेक दिवसांपासून स्पार्क होत होता. मात्र तरी त्याची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. मशीन चालू करण्यासाठी गेलेल्या यादव यांनी मशीनला हात लावताच विजेच्या झटक्याने ते मागे फेकले गेले.


एकाला अटक

या दुर्घटनेत यादव बेशुद्ध अवस्थेत कोसळले. त्यावेळी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळील शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी यादव यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून एकाला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा