सिप्झ कार्यालयाचा ई-मेल हॅक करणाऱ्यास अटक


सिप्झ कार्यालयाचा ई-मेल हॅक करणाऱ्यास अटक
SHARES

मुंबईच्या आर्थिक क्षेत्रात उलाढाल करणाऱ्या सिप्झचे ई-मेल खाते तब्बल 22 वेळा हॅक करून गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून एमआयडीसी पोलिसांनी बिनोद सिताराम अग्रवाल (24) याला बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याचा या ई-मेल हॅक प्रकरणातील उद्देश अद्याप समजू शकलेला नाही.


 22 वेळा ई-मेल हॅक

अंधेरीतील सिप्झ कार्यालयात कार्यरत असलेले उपविकास आयुक्त राम चौधरी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राम यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत बिनोदने तब्बल 22 वेळा सिप्झचे ई-मेल हॅक करत त्याचा तांत्रिकदृष्ट्या वापर केला.


कोण आहे बिनोद?

बिनोद हा गोरेगावच्या आरे कॉलनी पेट्रोलपंप परिसरातील पाम्स अपार्टमेंटमध्ये राहतो. सिप्झमध्ये बिनोद कंत्राटी स्वरुपात कामाला राहिला होता. कालांतराने त्याला कामावरून कमी केलं होतं. त्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेण्यात यावं यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र त्याकडे कुणी फारसं लक्ष देत नव्हतं.


बिनोदला पोलिस कोठडी

सिप्झचे अधिकारी राम यांनी गुन्हा नोंदवल्यानंतर बुधवारी पोलिस बिनोदच्या घरी पोहचले. त्यावेळी पोलिसांनी बिनोदला ताब्यात घेत, त्याच्या घरातून मोबाइल, लॅपटॉप, जिओ कंपनीची राऊटर हस्तगत केलं आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिनोदने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने बिनोदला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा